निवेदन क्र. 1
उद्देश: विविध विकास कामांच्या मोजमाप पुस्तिकेची माहिती सार्वजनिक करणे.
तपशील: या निवेदनाद्वारे आपण संबंधित प्राधिकरणाकडून विविध विकास कामांच्या मोजमाप पुस्तिका सार्वजनिक करण्याची विनंती करू शकता. या नमुन्यामध्ये आवश्यक सर्व माहिती आणि नमुना पत्र समाविष्ट आहे.
निवेदन क्र. 2
उद्देश: लेखा परीक्षण अहवाल सार्वजनिक करणे.
तपशील: लेखा परीक्षण अहवालामध्ये आर्थिक पारदर्शकता आणि जबाबदारीची माहिती असते. या निवेदनाद्वारे आपण संबंधित प्राधिकरणाकडून लेखा परीक्षण अहवाल सार्वजनिक करण्याची विनंती करू शकता.
निवेदन क्र. 3
उद्देश: कलम 4 (1) ख अंतर्गत माहिती प्रसिद्ध करणे.
तपशील: कलम 4 (1) ख अनुसार, सार्वजनिक प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण माहिती नियमितपणे प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. या निवेदनाद्वारे आपण प्राधिकरणाकडून आवश्यक माहिती प्रसिद्ध करण्याची विनंती करू शकता.
निवेदन अर्ज प्रक्रिया
- निवेदन अर्ज तयार करा:
- आपल्याला आवश्यक असलेला निवेदन अर्ज नमुना निवडा.
- अर्ज नमुना डाउनलोड करा किंवा कॉपी पेस्ट करा आणि त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरा.
- निवेदन अर्ज सादर करा:
- निवेदन अर्ज संबंधित कार्यालयात स्वतः किंवा नोंदणीकृत टपालाने सादर करा.
- निवेदन अर्जासोबत कोणतेही शुल्क जमा करण्याची आवश्यकता नाही.
- पोच पावती घ्या: अर्ज नोंदणीकृत टपाल द्वारे दाखल केल्यास पावती जतन करून ठेवावी.
- आपल्या अर्जाचा क्रमांक आणि पावती घ्या. हे भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त ठरतील.
- निवेदन दाखल केल्यानंतर उत्तराची प्रतीक्षा करा..!
आकर्षक वैशिष्ट्ये
- सुलभ नेव्हिगेशन: आपल्या आवश्यकतेनुसार अर्ज नमुने सहजपणे शोधा.
- डाउनलोड आणि मुद्रण: सर्व अर्ज word स्वरूपात डाउनलोड किंवा कॉपी पेस्ट करण्यासाठी उपलब्ध आहेत.